अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी भरती प्रक्रिया सुरू, लष्कराकडून घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : देशभरात लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असतानाच सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नव्या योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरू केल्याची घोषाण लष्करातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सध्या केवळ ४६ हजार सैनिकांची अग्निपथ योजनेतून भरती करण्यात येणार आहे. हळहळू हे प्रमाण जवळपास १.२५ लाखापर्यंत जाईल. त्यासाठी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे रजिस्ट्रेशन २४ जूनला सुरू होईल.

त्यानतंर २४ जुलैपासून पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेतल्या जातील. यातील पहिली बॅच डिसेंबर अखेरीस ट्रेनिंगसाठी दाखल होईल. देशात २१ नोव्हेंबरपासून पहिला नौदलातील अग्निवीर त्याच्या ट्रेनिंगला सुरुवात करेल.

यामध्ये महिला आणि पुरुष दोन्हींना संधी असेल.मात्र, प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. पोलीस व्हेरिफिकेशन सक्तीने करावे लागणार आहे. ते असल्याशिवाय भरती करता येणार नाही, अशी प्रमुख अट टाकण्यात आली आहे.