Redmi Note 12 Pro 5G : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi ने काही दिवसांपूर्वी आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Redmi Note 12 Pro 5G लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 31,999 रुपये इतकी आहे. तुम्ही आता तो खूप स्वस्तात खरेदी करू शकता.
तुम्हाला अशी भन्नाट ऑफर Xiaomi फॅन फेस्टिव्हलमध्ये मिळत आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीकडून यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. परंतु हे लक्षात ठेवा की कंपनीची ही ऑफर काही दिवसांसाठीच उपलब्ध असणार आहे.
जाणून घ्या Redmi Note 12 Pro 5G चे वैशिष्ट्ये आणि तपशील
या फोनमध्ये कंपनी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देत असून तो डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्टसह येतो. इतकेच नाही तर त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. कंपनीचा हा फोन 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो. तर या फोनमध्ये कंपनीकडून ARM Mali-G68 MC4 GPU सह MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात येत आहे.
तर फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेशचा समावेश असणार आहे. तर सेल्फीसाठी, कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे.
साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची बॅटरी 46 मिनिटांत पूर्ण चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.