Char Dham Yatra 2023 : चार धाम यात्रेसाठी नोंदणी करताय? यावेळी करावे लागणार हे काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Char Dham Yatra 2023 : चार धाम यात्रा प्रत्येक वर्षी एप्रिल-मेमध्ये सुरू होऊन ती ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालते.उत्तराखंड सरकारने आता चार धाम यात्रेसाठी राज्यात येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी फोटोमेट्रिक/बायोमेट्रिक नोंदणी बंधनकारक केली आहे.

मोठ्या संख्येने भाविक चार धाम यात्रेसाठी दाखल होतात. सर्वात महत्त्वाचे आणि आनंदाची बाब म्हणजे चार धाम यात्रेसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकता. परंतु, आता तुम्हाला चार धाम यात्रेसाठी नोंदणी करताना काही काम करावे लागणार आहे.

असणार अनेक नोंदणी काउंटर

आता ऑफलाइन नोंदणीसाठी चार धाम यात्रा मार्गावर अनेक नोंदणी काउंटर उपलब्ध आहेत. हे लक्षात घ्या की चारधाम भक्तांसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर किंवा नोंदणी काउंटरवर विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक वर्षी ही यात्रा एप्रिल-मेमध्ये सुरू होऊन ती ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालते.

गरजेची आहे ही कागदपत्रे

चार धाम बायोमेट्रिक नोंदणीसाठी तुमच्याकडे तुमचे ओळखपत्र असणे खूप गरजेचे आहे. मग हे ओळखपत्र आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी काहीही असू शकते. प्रवास नोंदणीला प्रवास पास, प्रवास परवाना किंवा नोंदणी कार्ड असेही संबोधले जाते. यात्रेकरू आता हे नोंदणी कार्ड वापरून भोजन आणि निवास यासारख्या विविध विशेष सुविधांची निवड करू शकतात.

अशी करा ऑनलाइन नोंदणी

  • जर तुम्हाला चारधाम यात्रेसाठी नोंदणी करायचे असेल तर तुम्हाला http://www.registrationandtouristcare.uk.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर चारधाम यात्रा 2023 ऑनलाइन नोंदणी/लॉगिन फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी नोंदणी/लॉगिन वर क्लिक करा.
  • आता नोंदणीसाठी तुमची वैयक्तिक माहिती प्रविष्ट करण्यासाठी तुमच्यासाठी समोर एक नवीन विंडो उघडली जाईल.
  • त्यानंतर चारधाम ऑनलाइन नोंदणी प्रणालीद्वारे मोबाइल आणि ईमेलद्वारे ओटीपी पडताळणीद्वारे नोंदणीची पडताळणी करण्यात येईल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्डने लॉग इन करावे लागणार आहे.
  • वैयक्तिकृत डॅशबोर्ड दिसेल; ज्यात तुम्हाला विंडो उघडण्यासाठी Add/manage Pilgrims or Tourists वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर फॉर्म सेव्ह करण्यापूर्वी टूर प्लॅन तपशील प्रविष्ट करा. जसे की यात टूर प्रकार, टूरचे नाव, प्रवासाच्या तारखा, पर्यटकांची संख्या आणि प्रत्येक गंतव्यस्थानाच्या प्रवासाच्या तारखा इ. असू शकते.
  • टूरचे नाव, तारखा आणि गंतव्यस्थानाची माहिती असलेली तुमच्यासमोर एक विंडो दिसेल.
  • Add Pilgrim बटणावर क्लिक करून तुम्ही यात्रेकरूंची माहिती प्रविष्ट करू शकता.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला नोंदणी क्रमांकासह एक एसएमएस प्राप्त होईल त्यानंतर तुम्ही चार धाम यात्रेसाठी नोंदणी पत्र डाउनलोड करू शकता.