तीन सप्टेंबरपर्यंत देवरे यांची बदली करा; अन्यथा …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची ३ सप्टेंबरपर्यंत बदली झाली नाही तर जिल्हा महसूल कर्मचारी व तलाठी, मंडल अधिकारी संघटना काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन देण्यात आले आहे. मात्र जनतेचे, विद्यार्थ्यांचे अत्यावश्यक आरोग्यविषयक, शैक्षणिक दाखले आंदोलनस्थळी देण्यात येतील, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ, सरचिटणीस सुरेश जेठे, महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, महसूल कर्मचारी संघटनेचे पारनेर तालुकाध्यक्ष महेंद्र रोकडे,

तलाठी संघाचे पारनेर तालुकध्यक्ष संतोष मांडगे यांच्यासह कैलास साळुंके, विजय धोत्रे, अक्षय फलके, संतोष तनपुरे, सचिन औटी, पंकज जगदाळे,

कैलास खाडे या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघाच्या मागण्यांना जिल्हा संघटनांचा पाठिंबा आहे.

३० ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी, तलाठी व मंडल अधिकारी काळ्या फिती लावून काम करतील. ३ सप्टेंबर पर्यंत वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.