राष्ट्रवादी युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहित पाटील निश्चित?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  सर्वाधिक 28 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलं आहे. या सगळ्यात नगर पंचायत निवडणूक गाजवली ती दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलने.

अवघ्या 23 वर्षाच्या या उमद्या पोरानं स्वकियांसह विरोधकांनाही धोबीपछाड देत कवठे-महाकाळ नगर पंचायत आपल्या ताब्यात मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांच्या तोंडावर सध्या रोहित पाटील यांचंच नाव आहे.

अशावेळी रोहित पाटील यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत. रोहित पाटील यांचं कौतुक करताना रोहित पवार म्हणाले की, रोहित पाटीलसारखी मुलं विधानसभेत येणं गरजेचं आहे.

त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. मात्र, वय झालं की पक्ष नक्की विचार करेल, येत्या काळात पक्ष संधी देईल असा मला विश्वास आहे.

रोहितला आता पक्षाचं पद किंवा जबाबदारी द्यायला हवी, असं मोठं आणि सूचक वक्तव्यही रोहित पवार यांनी यावेळी केलंय.

त्याचबरोबर रोहित पाटील हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. रोहित पाटील जनतेत मिसळणारा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला, असंही रोहित पवार म्हणाले होते.