“सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी, तर त्यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस…”; सदाभाऊंच्या टीकेला मिटकरींचे कडाडून प्रत्युत्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले त्यांनतर सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांच्यावरच हल्लाबोल चढवला त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून आले आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहीत आहे.

काश्मीर फाईलच्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आता सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

तसंच सदाभाऊ हे स्वत: बोलत नाहीत, तर त्यांचे मास्टरमाईंड (Mastermind) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलतात अशी टीका त्यांनी केली होती.

त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अमोल मिटकरींना माहिती नाही. मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस आहे.

त्यामुळे तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. बाजारू भाषणं करायची… त्यामुळे सदाभाऊ सुपारी बहाद्दर नाही. तुम्ही सुपारी घेऊन ढोल-ताशा वाजवणाऱ्या बँडबाजावाले आहात.

त्यामुळे तुमच्या वक्तव्याला महत्वं द्यावं असं काही नाही. वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला याचा अभ्यास अमोल मिटकरींनी करावा. अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर पलटवार केलाय.

अमोल एक चांगला वक्ता आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण अमोलने राजकारणाच्या या गटारगंरेत आपली वक्तृत्वाची तलवार चालवू नये अशी टीका सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर केली आहे.

शरद पवारांविषयी काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

‘शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे लाग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे.

आयुष्यभर त्यांनी आग लावायचे काम केले. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली होती.