Samsung Galaxy F14 5G : 6000mAh बॅटरी असणारा सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च, मिळणार पॉवरफुल प्रोसेसर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy F14 5G : दिग्ग्ज टेक कंपनी सॅमसंगने अखेर भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची खासियत म्हणजे कंपनी यात 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये सादर केला आहे.

तसेच यात 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आणि 50MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे. कंपनीचा आता हा F सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy F14 5G असणार आहे. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन काय असणार ते जाणून घेऊया.

किती असणार किंमत?

कंपनीच्या नवीन स्मार्टफोनला OMG Black, G.O.A.T. ग्रीन आणि B.A.E. जांभळ्या रंगाच्या पर्यायामध्ये ऑफर केले जात आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. एक म्हणजे 128 GB स्टोरेजसह त्याच्या 4 GB रॅमची किंमत 12,990 रुपये तर दुसरा 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 14,990 रुपये इतकी आहे. जर हा फोन तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तो तुम्ही 30 मार्चपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह रिटेल स्टोअरमधून फोन खरेदी करता येईल.

काय असणार Samsung Galaxy F14 5G चे स्पेसिफिकेशन?

कंपनीचा हा फोन Android 13 आधारित OneUI 5.0 सह सादर केला असून जो चार वर्षांच्या सुरक्षा अद्यतनांसह दोन वर्षांसाठी ओएस अपग्रेड मिळेल. हा 5nm Exynos 1330 प्रोसेसरने सुसज्ज असून यामध्ये 6.6-इंच फुलएचडी प्लस IPS LCD डिस्प्ले पॅनल दिला आहे, तसेच 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण दिले आहे. या फोनमध्ये 6 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील समर्थित आहे.

कसा असणार नवीन कॅमेरा?

Samsung Galaxy F14 5G सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असून ज्यात प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेलवर उपलब्ध आहे. तर फोनमधील दुय्यम कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

जाणून घ्या Samsung Galaxy F14 5G ची बॅटरी

सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे. तर 25W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. या फोनमधील कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्ट समर्थित असून यात सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.