Scorpio N waiting period : महिंद्रा स्कॉर्पियो खरेदीच स्वप्न विसरा ! आता बुक केली तर मिळेल इतक्या वर्षांनंतर..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Scorpio N waiting period : महिंद्राच्या (Mahindra) नवीन Scorpio N ची (Scorpio N) डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. कंपनीने या वर्षी नोव्हेंबरपर्यंत स्कॉर्पिओ एनच्या 25,000 युनिट्स वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

बहुतेक टॉप-एंड Z8 L व्हेरियंट वितरित केले जातील. स्कॉर्पिओ एन लाँच होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत, पण लोकांची त्याबद्दलची क्रेझ कमी होत नाहीये. Scorpio N चा वेटिंग पिरियड जवळपास दोन वर्षांपर्यंत पोहोचला आहे.

या प्रकरणात, Scorpio N ने महिंद्राच्या XUV700 ला मागे टाकले आहे. स्कॉर्पिओ एन आता भारतातील सर्वात जास्त वेटिंग पीरियड असलेली एसयूव्ही बनली आहे. Scorpio N ने पहिल्याच दिवशी बुकिंगच्या बाबतीत विक्रम केला होता. अवघ्या एका मिनिटात 25,000 Scorpio-N चे बुकिंग झाले. Mahindra Scorpio N ची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

कंपनीने Scorpio N ला पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह एकूण पाच व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. Scorpio N चा  वेटिंग पिरियड आता पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंट साठी जवळपास 22 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. तुम्ही आज Scorpio N बुक केल्यास, तुम्हाला ते 2024 मध्ये मिळेल.

कंपनी या महिन्यापासून नवीन स्कॉर्पिओची डिलिव्हरी सुरू करणार आहे. पहिल्या 20 दिवसांत 7,000 Scorpio N युनिट्स ग्राहकांना देण्यावर कंपनीचा भर असेल. महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये तयार करण्यात आली आहे.

नवीन स्कॉर्पिओची डिजाईन महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओमध्ये (Mahindra India Design Studio) करण्यात आली आहे. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा स्कॉर्पिओ एनचे इन्स्ट्रुमेंट कन्सोल पूर्णपणे डिजिटल असेल. महिंद्राच्या नवीन Scorpio N मधील टचस्क्रीन सिस्टीमचा आकारही मोठा आहे. 8-इंचाची टचस्क्रीन असलेली इन्फोटेनमेंट सिस्टिम त्याचे इंटीरियर मजबूत बनवत आहे. याशिवाय स्कॉर्पिओ N मधील ब्रेक लाईट दोरवर वरच्या बाजूला लावलेली आहे आणि टेल लाईट C-आकारात आहे.

Scorpio-N डिझेल आणि पेट्रोल दोन्ही इंजिनसह लॉन्च करण्यात आली आहे. दोन्ही इंजिनांना मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल. फोर व्हील ड्राइव्ह (4WD) फीचर्स फक्त Scorpio-N च्या डिझेल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे जसे की Z4, Z8, Z8L. हे पाच व्हेरियंट  Z2, Z4, Z6, Z8, Z8L मध्ये उपलब्ध असतील.

महिंद्राच्या टॉप-स्पेक स्कॉर्पिओ N Z8L ला जास्त मागणी आहे. कंपनी प्रथम ते वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच वेळी, महिंद्राच्या XUV700 च्या काही व्हेरियंटवर वेटिंग पिरियड कमी झाला आहे. टॉप-स्पेक AX7 L वर जवळपास 16 महिन्यांचा वेटिंग पिरियड आहे. त्याची वेटिंग पिरियड आधी सुमारे 19 महिने होती.