अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जावरील व्याजदर आठ टक्के करून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डिव्हिडंड चे तात्काळ वाटप करावे अशी आग्रही मागणी राहुरी तालुका शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली.

शिक्षक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शिक्षक बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जाचा व्याजदर आठ टक्के करावा. आरबीआय च्या संदर्भित आदेशानुसार आपलेकडे सभासदांना वाटप करण्यास दिर्घकाळ प्रलंबित असलेले डीव्हीडंड वाटप तातडीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशीच करावे.

संचालक मंडळाची मुदत संपून बराच कालावधी झालेला आहे. प्रस्तावित वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक आयोजित करणेचा ठराव मांडून मंजूर करणेची शिफारस करावी. तसेच ऐनवेळच्या विषयात निवडणूक मतदारसंघ रचनेत अनुसूचित जाती आणि जमाती साठी दोन्ही मिळून एकूण फक्त एकच सदस्य घेतला जातो.

हे कार्यरत अनुसूचित जाती आणि जमाती सभासदांच्या प्रमाणात अन्यायकारक आहे. त्यामुळे निवडणूक ठराव करताना निवडणूक मतदारसंघ रचनेत अनुसूचित जाती आणि जमाती साठी दोन्ही मिळून एकूण दोन सदस्य घेण्याची सर्वसाधारण सभेस शिफारस करावी.

अशी आग्रही मागणी शिक्षक परिषदेचे रवींद्र अरगडे,कल्याण राऊत,शंकर गाडेकर,अमोल लांबे,काशीनाथ भारमल,बाळासाहेब गोरे,मनोज पालवे आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.