Shinde group MLA : शिंदे गटाच्या आमदारांची पुन्हा गुवाहाटी वारी, यामागचं कारण काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shinde group MLA : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडून काही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर याच आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.

आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटातील आमदार गुवाहाटी आणि अयोध्येला जाणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

शिवसेनेतून फूट पडली तेव्हा मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेले ५० आमदार हे गुवाहाटीला गेले होते. तसेच आता पुन्हा एकदा हे आमदार गुवाहाटीला जाणार असल्याने सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न पडले आहेत.

मात्र शिंदे गटातील आमदारांचा गुवाहाटी दौरा कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र हिवाळी अधिवेशना अगोदर शिंदे गटातील आमदारांचा हा दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही लवकरच अयोध्या आणि गुवाहाटीला जाणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.

तेव्हा आम्ही अयोध्येला जायला निघालो होतो. आमचे बोर्डिंग पास तयार होते. पण आम्हाला विमानतळावरून परत पाठवलं होतं. तो आमचा दौरा अर्धवट राहिला आहे. म्हणूनच आम्ही आता अयोध्येला जाणार आहोत अशी माहिती देसाई यांनी दिली आहे.

पुढे बोलताना देसाई म्हणाले, अयोध्येला गेल्यावर आम्ही श्रीरामाचं दर्शन घेणार आहोत. तसेच गुवाहाटीला जाऊन आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, राज्याला आम्ही नंबर एकवर पोहोचवणार असल्याचेही शंभुराज देसाई यांनी सांगितले आहे.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच चित्र स्पष्ट होईल असेही शंभुराज देसाई म्हणाले आहेत.