Shivajirao Kardile: जिल्हयात कर्डीले पुन्हा चर्चेत,’त्या’ प्रकरणात केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले,नगर जिल्ह्याला.. 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shivajirao Kardile :  नुकताच महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक पार पाडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविकास आघाडी सरकारला (MVA) धक्का देत माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांना विजयी केला.

या विजय नंतर आज राम शिंदे यांचा अहमदनगर भाजपाकडून सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर मोठी भविष्यवाणी केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सध्या कर्डीले चर्चेत आहे. 

कार्यक्रमात बोलताना कर्डीले म्हणाले कि  सत्ता असो अथवा नसो भाजप कार्यकर्ते नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन काम करतात. राम शिंदे यांच्या रुपाने जिल्ह्याला विधानपरिषदेत संधी दिली, या बद्दल देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त करतो.

गरीब शेतकरी कुटुंबातील शिंदे हे मंत्री होतील पुढे विधानपरिषदेवरही जातील असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. मात्र भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी दिली जाते, याचे हे उदाहरण आहे. आमदारांच्या बंडाच्या माध्यमातून जनतेच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. त्यांच्याच मंत्र्यांना, आमदारांना सरकारमध्ये सन्मान नव्हता. महाविकास आघाडीचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला, असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी पाहिले की, राज्य सरकारमध्ये सन्मान मिळत नाही. त्यामुळे ते सन्मान मिळविण्यासाठी बाहेर पडले. 3 जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. मी काही हात पाहून भविष्य सांगत नाही.

मी तोंड पाहून भविष्य सांगतो. राम शिंदे यांना फडणवीस विधानपरिषदेवर संधी देणारच होते म्हणून मी संधी साधून शिंदेंना विधानपरिषदेवर पाठविण्याचा ठराव मांडला होता. मला खात्री होती की राम शिंदे हे विधानपरिषदेवर आमदार होतील, असे गुपित त्यांनी सर्वांसमोर सांगतले.  

आता मी आणखी एक भविष्यवाणी करतो. यात राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होतील. महिलांतून मोनिका राजळे मंत्री होतील. मात्र मला माजी ते माजीच ठेऊ नका. तसे केले तर तुम्हाला ठेवायचे की नाही याची शक्ती मी ठेऊन आहे. आमचे तुमच्यावर अतिक्रमण होणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांची तब्बेत चांगली नव्हती. ते आले तर त्यांच्याही मंत्रीपदाचा विचार करा, अशी कोपरखळीही कर्डिले यांनी मारली.