file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या तरुणाला आरडाओरड करून उठविले आणि ब्लेडने वार करत लाकडी दांड्याने मारहाण करून सर्व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या घटनेत विजय सुनील आडसूळ (रा. देवळाली प्रवरा) हा तरुण जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, विजय आडसूळ हा त्याच्या घरात झोपला होता. त्यावेळी आरोपी सुधीर उर्फ सुक्या रा. देवळाली प्रवरा हा अनाधिकाराने त्यांच्या घरात घुसला आणि मोठमोठ्याने आरडाओरड करून तुझा भाऊ अजय कोठे आहे?

असे म्हणाला. त्यावेळी विजय आडसूळ म्हणाला, काय झाले? तू मोठ्याने घरात आरडाओरडा करू नको. असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपीने त्याला शिवीगाळ करून ब्लेडने वार केले.

Advertisement

तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. तुझा भाऊ अजय यास समजावून सांग नाहीतर तुमच्या सर्व कुटुंबाला जिवंत सोडणार नाही असा दम दिला.

असे फिर्यादीत म्हटले आहे. विजय आडसूळ याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी सुधीर उर्फ सुक्या याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement