ताज्या बातम्या

Small Business Idea : नोकरीपेक्षा कराल जास्त कमाई! त्यासाठी आजच सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, सरकारही करत आहे मदत

Small Business Idea : अनेकजण व्यवसाय सुरु करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकार आता व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करत आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर मुद्रा योजना तुमच्यासाठी आहे.

या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय एकूण 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. तुम्ही आता सरकारी मदत घेऊन ट्रॅक सूट निर्मितीचा व्यवसाय करू शकता. जर तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता.

ट्रॅक सूटमध्ये वर्कआउट करण्यापासून ते योगा करण्यापर्यंत खूप आराम मिळत असतो. त्यामुळे सतत एक्सरसाइज करत असताना आरामदायी पोशाख वापरले पाहिजेत, असे तज्ञांचे मत आहे. अनेकजण व्यायाम करण्यासाठी तसेच धावण्यासाठी ट्रॅक सूटचा वापर करत असतात. त्यामुळे लहान-मोठ्या शहरात सगळीकडे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सुरू करा ट्रॅक सूट निर्मितीचा व्यवसाय

ट्रॅक सूट हा साधारणपणे कापूस, नायलॉन, पॉलिस्टर सिंथेटिक फॅब्रिकपासून बनवण्यात येतात. ते सहज धुता येतात. ट्रॅकसूट बनवणे सहज,सोपे आणि आटोपशीर आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालानुसार, तुम्ही ट्रॅक सूट निर्मितीचा व्यवसाय हा 8.71 लाख रुपयांपासून सुरू करू शकता.

यात उपकरणांवर 4.46 लाख रुपये तर खेळत्या भांडवलासाठी 4.25 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर, तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज घेता येते. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघु उद्योग सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळते.

किती होईल नफा?

KVIC अहवालानुसार, एका वर्षात 48,000 ट्रॅकसूट बनवता येत असून जर 106 रुपये दराने, त्याची किंमत 51,22,440 रुपये असेल. तर दुसरीकडे, 100 टक्के उत्पादन क्षमतेसह, एकूण 56,00,000 रुपयांची विक्री करण्यात येऊ शकते.

एकूण अधिशेष रु.4,77,560 असणार आहे. या अहवालानुसार, सर्व खर्च वजा केला तर, एक व्यक्ती सहजपणे एका वर्षाला 4,33,000 रुपये कमवू शकते. म्हणजेच तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही दर महिन्याला 40,000 रुपये कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts