file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात दिवसभरात ७८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक २१६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख २० हजार १२९ झाली आहे.

दरम्यान आज दिवसभरात कोरोना उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ५०५ झाली आहे. जिल्ह्यात आज ६४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ७२० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९७ आणि अँटीजेन चाचणीत ४४४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४,अकोले ०२, जामखेड ०९, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०१, पाथर्डी ०४, राहाता ०१, संगमनेर १२, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.