सामाजिक संस्था मानव सेवेतून परिवर्तन घडवतील -ऍड. मेहेरनाथ कलचुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-   सामाजिक संस्था मानव सेवेतून परिवर्तन घडवतील. मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा आहे. कोरोना महामारीत या गोष्टींचा सर्वांना अनुभव आला, मनुष्यच मनुष्याच्या मदतीसाठी धावून आला. माणुसकीचे दर्शन आपल्या कृतीतून दाखवून दिले तर समाजात शांतता व समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे संचालक ऍड. मेहेरनाथ कलचुरी यांनी केले.

जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. महाराष्ट्र राज्य, शहर बार असोसिएशन व कासा मनुष्यबळ विकास केंद्राच्या वतीने पहिल्या जिल्हास्तरीय एन.जी.ओ. मार्गदर्शन कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ऍड. कलचुरी बोलत होते. नगर-दौंड रोड येथील कासा मनुष्यबळ विकास केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास जय असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष कैलास पठारे,

राज्य उपाध्यक्ष ऍड. प्रशांत साळुंके, राज्य समन्वयक इसाभाई शेख, डॉ. अमोल बागुल, सुनील गायकवाड, ऍड. अनिता दिघे, ऍड. भानुदास होले, ऍड. सुनिल तोडकर, पोपटराव बनकर, जय असोसिएशनचे राज्याध्यक्ष ऍड. महेश शिंदे आदिंसह स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते कैलास पठारे म्हणाले की, खर्‍या अर्थाने सामाजिक संस्था तळागाळापर्यंत व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे.

समाज कार्य करताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, कार्य केल्यास समाधान लाभते. जय असोसिएशन राज्यभरातील संस्थांना संघटित करून त्यांना दिशा देण्याचे कार्य गेल्या दहा ते बारा वर्षापासून करीत आहे. शासनही असोसिएशनच्या कार्याची निश्‍चित दखल घेईल.

तसेच बेटी बचाव बेटी पढाव, मतदार जागृतीवर आधारित लघुचित्रपटासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. सुनील गायकवाड यांनी संस्थेचे ध्येय, व्हिजन, मिशन व त्याबाबतची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जय असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. महेश शिंदे यांनी संस्थेची स्थापना, संस्थेचे रेकॉर्ड, लेखापरीक्षण, प्रस्ताव, अंमलबजावणी अहवाल याबाबत माहिती दिली.

उपस्थितांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी संस्था प्रतिनिधींचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विशेष कार्य करणार्‍या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यशाळेत ऍड. पुष्पा जेजुरकर, आरती शिंदे, नयना बनकर, दिनेश शिंदे, हसन पटेल, बाबा शेख, राजश्री साळुंके,

प्रमोद वाळके, विनायक नेवसे, ऍड. गौरी सामलेटी, सुभाष काकडे, सुरेश बागुल, रजनी ताठे, आदर्श ढोरजकर आदींसह विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पुणे, बीड, सातारा या ठिकाणी जय असोसिएशनच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्याचा ठराव संमत करण्यात आला.