Soybean Farming: खरीप हंगाम आला सोयाबीन पेरणीचा टाईम झाला!! सोयाबीन पेरणीसाठी कृषी विभागाने जारी केला महत्त्वपूर्ण सल्ला; वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi news : मित्रांनो देशातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या रब्बी व उन्हाळी हंगामातील (Summer Season) कामे आपटून खरीप हंगामासाठी ( Season) नियोजन करण्यात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी शेतजमिनीची पूर्वमशागत देखील उरकून टाकली आहे.

याशिवाय शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणांचा तसेच खतांचा साठा करण्यास देखील आता सुरुवात केली आहे. खरीप हंगाम आता बोटावर मोजण्याईतक्या काही दिवसांवर आला आहे.

या अनुषंगाने शेतकरी बांधवांसमवेतच कृषी विभागाने देखील आता कंबर कसली आहे. उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाने आता जोमात काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या विषयी कृषी विभागाने महत्त्वाचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.

यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होणार आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका बसला होता, त्यामुळे सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला होता.

यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी घरातील बियाण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बियाणांचा तुटवडा नाही, त्यामुळे उन्हाळ्यात सोयाबीनची लागवड (Soybean Farming) करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला होता, तो यशस्वीही झाला. गतवर्षी निसर्गाच्या कुशीत सापडल्याने यंदा कोणतीही चूक होणार नाही याची काळजी कृषी विभाग घेत आहे.

बाजारातून आणलेल्या सोयाबीन बियाण्यांबाबत शेतकरी अनेकदा तक्रार करतात की बियाणे चांगले उगवत नाही. गेल्या वर्षी झालेल्या पावसात सोयाबीनचा दर्जाही खालावला आहे. यासाठीच शेतकऱ्यांनी घरातील बियाणांची उगवण क्षमता तपासून त्यांचीच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

खरीप हंगामात बियाण्यांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे, हे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आढळून येते आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

खरिपात सोयाबीन लागवडीवर अधिक भर
सोयाबीन हे खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. कमी खर्च आणि जास्त उत्पादकता यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीनचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यात खरीपात 60 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, गेल्या वर्षीच्या पावसामुळे सोयाबीन बियाणांचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे.

या कारणास्तव शेतकऱ्यांना बाजारातून आणलेल्या बियाण्यांऐवजी घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिला जातं आहे. मात्र असे असले तरी उन्हाळ्यातही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली असल्याने सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासण्याची शक्यता कमी आहे.

सोयाबीनची उत्पादकता वाढवण्यासाठी या खरीपात भर दिला जाणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना प्रगत पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत आहेत. रब्बी हंगामानंतर खरिपातील सोयाबीन लागवडीसाठी पुरेसा वेळ आहे.

अशा स्थितीत काढणीपूर्व तयारी चांगली केल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळणार असल्याचे कृषी तज्ञांनी नमूद केले आहे. निश्चितचं शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करण्यासाठी आपल्याजवळील बियाण्यांचा अधिकाधिक वापर करावा जेणेकरून शेतकरी बांधवांना उत्पादन वाढविण्यास मदत होईल.