कल्याण रोड भागात लसीकरण केंद्र सुरू करा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- प्रभाग क्रमांक ८ मधील शिवाजीनगर नगर कल्याण रोड येथील जिल्हा परिषद शाळा येथे नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. शिवाजीनगर, नगर कल्याण रोड उपनगरामध्ये एकही लसीकरण केंद्र नाही. या परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी शहरातील इतर भागातील लसीकरण केंद्रामध्ये जावे लागते.

तेथे जाऊनही लसीकरणासाठी आधीच प्रचंड गर्दी असल्यामुळे या भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित आहे. प्रभाग क्रमांक आठ मधील कल्याण रोड परिसरात लोंढे मळा, दातरंगे मळा, ठाणगे मळा,शेळके वस्ती, माधव नगर,

आदर्श नगर, विद्या कॉलनी, समता नगर, अनुसया नगर, जाधव नगर, शिवाजी नगर, व्यंकटेश सोसायटी, साईराम सोसायटी, आनंद पार्कभावना ऋषी सोसायटी, प्रशांत सोसायटी बालाजी सोसायटी, मेवाड नगर, श्रीकृष्ण नगर, गणेश नगर ,

वारुळाचा मारुती आदी भाग असून या भागात २५ ते ३० हजार लोकवस्ती असुन या भागात पालिकेचे एकही लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी इतर लसीकरण केंद्रावर फिरावे लागते.

लसीकरण केंद्रावर असणाऱ्या गर्दीमुळे जेष्ठ नागरिक व महिला वर्ग यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक प्रभाग क्रमांक ८ मधील जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार माझ्याकडे करीत आहेत.

या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या असल्यामुळे या भागात लसीकरण केंद्राची गरज आहे. तरी प्रभाग क्रमांक मधील जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, असे नळकांडे यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|