स्टंटबाजी करून त्याचे श्रेय घेण्याचा उद्योग बंद करा..! बाजार समितीचे माजी सभापती नाहाटा यांची टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कालवा सल्लागार समितीचे तालुक्यातील सदस्य ओव्हरफ्लोचे पाणी आपल्यामुळे सुटल्याचे सांगत होते. मात्र आता पाणी बंद झाले आहे त्याचे श्रेयही त्यांचेच आहे असेच म्हणावे लागेल. पाणी बंद झाल्याचे ते श्रेय घेतील का?

असा सवाल बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांनी घनश्याम शेलार यांचा नामोल्लेख टाळत केला. नाहटा पुढे म्हणाले, तालुक्यातील सर्व क्षेत्राचे सिंचन होणे गरजेचे आहे. पाण्याच्या बाबतीत कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.

एखाद्या प्रश्नाचा स्टंट करून त्याचे श्रेय घेण्याचा उद्योग बंद करा. जनतेला सगळं माहीत आहे. असा खोचक सल्लाही नाहटा यांनी दिला. कुकडीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यावर कायम ही वेळ आहे. विसापूर धरणात पाचशे क्यूसेक्सने पाणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल.

प्रत्यक्षात दोनशे क्यूसेक्सने पाणी सुरू आहे. लोकांना दिशाभूल करणारी माहिती देऊन त्यांच्या भावनांशी खेळू नका अन्यथा उद्रेक होईल असे बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले.सध्या पावसाचे दिवस आहेत मात्र पावसाने आखडून धरल्याने उभी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहे.

कुकडीचे पाणी वेळेवर मिळाले तर या पिकांना जीवदान मिळणार आहे अन्यथा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे.