अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून करोना प्रादुर्भावर प्रतिबंध घालण्यासाठी नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शनिवार दि. 28 ऑगस्टपासून पाच दिवस गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाची साखळी तोडण्याकरीता गावातील करोना नियंत्रण समितीने हा निर्णय घेतला आहे. काय सुरु? काय बंद राहणार? जाणून घ्या बेळपिंपळगावात 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात गावातील दवाखाना, मेडिकल, दुग्धव्यवसाय वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.

गावातील आठवडे बाजार, हॉटेल, किराणा, कापड दुकान आदींसह सर्व व्यवसाय-दुकाने बंद असतील. तर दंडात्मक कारवाई होणार…

गावात इतर विनाकाम व विना मास्क फिरणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून आर्थिक दंड देखील करण्यात येणार आहे. जर या काळात दुकान उघडे सापडले तर 1100 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्यांदा दुकान उघडे आढळून आले तर पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अनेक रुग्ण गावात सापडत असल्याने नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सर्वांनी नियमांचे पालन करुन करोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.