फी भरून घेतल्याशिवाय दाखले मिळेना, विद्यार्थी छेडणार आंदोलन!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फी भरून घेतल्या शिवाय दाखले मिळत नसल्याने या विषयावर तात्काळ तोडगा काढला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

देवळाली येथील येथील आय टी विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयाकडे चकरा मारीत असून केवळ आय टी विषयाची फी भरायची बाकी राहिल्याने विद्यालय विद्यार्थ्यांना दाखले देत नाही.

त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे पालक फी भरू शकत नाही तर दुसरीकडे पुढील शिक्षणाची ऍडमिशन ची मुदत संपत आलेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

मुलांसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झालेने आज आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली येथील आय टी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आय टी विषयाची फी माफ करून पुढील शिक्षणासाठी तात्काळ दाखले मिळावे अशी विनंती करणारे निवेदन शाळेत जाऊन प्राचार्य गुंड सर यांना दिले.

यावेळी जयदीप येवले, आबीद शेख, प्रसाद सांगळे, दीपक होले, यशोदीप विघे,वेदांत विश्वासराव आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.