अशी वेळ कोणत्याही शेतकर्यावर येऊ नये ! जीवापाड जपलेली फळबाग …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची सिताफळाची बाग अज्ञाताने खोडासह कापल्याची संतापजनक घटना घडली आहे.

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील शेतकरी अशोक म्हस्के यांनी दोन वर्षांपूर्वी उसनवारीने पैशे घेऊन दीड एकर क्षेत्रात सिताफळीची लागवड केली होती. मात्र, शुक्रवारी (ता. 27) शेतकरी म्हस्के सकाळी शेतात गेले असता त्यांना बागेतील झाडे कापल्याचे दिसले.

अज्ञाताने म्हस्के यांच्या शेतीतील तब्बल शंभरहून अधिक झाडे कापली. याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून दोषींविरुद्ध कडक करवाईची मागणी केली आहे. म्हस्के यांच्या दीड एकर क्षेत्रातील सहाशे झाडांपैकी शंभरहून झाडे खोडापासून कापून टाकली आहेत.

पोलिसांत तक्रारीनंतर पोलीस अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. दोषींविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाने भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बालमटाकळी येथील शेतकरी अशोक रमेश म्हस्के (वय २७) यांनी दोन वर्षांपूर्वी उसनवारीचे पैसे तसेच काही बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले. त्यातून गट नंबर ४१/५ मधील दीड एकर क्षेत्रात साडेसहाशे सीताफळाच्या झाडाची लागवड केली. दोन वर्षांपासून फळबागेस जीवापाड जपल्याने ती बहारात आली.

ऐन फळधारणेच्या कालावधीतच त्यांच्यावर कोणीतरी खोडील माणसाने सूड उगवला. त्यांच्या शेतातील जवळपास शंभर-सव्वाशे सीताफळ झाडे खोडापासून तोडून टाकली.

म्हस्के हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले, तेव्हा त्यांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला. कारण समोर तोडून टाकलेली झाडे दिसताच ते हबकून गेले.त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दाखल केली.