Sugarcane Producer : ऊसतोड झाली ना! मग कोणाची वाट बघता खोडव्याचे उत्पादन घ्या; उत्पन्न वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Sugarcane Producer : यावर्षी महाराष्ट्राने गाळप हंगामात सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी साखरेचे उत्पादन घेतले. साखर उत्पादनात महाराष्ट्र (Maharashtra) आता देशात अव्वल स्थानी असून त्याने उत्तर प्रदेश राज्याला धोबीपछाड दिली आहे.

यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत आहेत. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे ऊस एक नगदी पीक (Cash Crop) आहे.

याची भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महाराष्ट्रात उसाची शेती (Sugarcane Farming) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) उसाची शेती प्रामुख्याने बघायला मिळते असे असले तरी मराठवाड्यात आता उसाची लागवड (Sugarcane Cultivation) हळूहळू विस्तारू लागली आहे.

केवळ पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातच नव्हे तर राज्यातील इतरही भागात थोड्या-अधिक प्रमाणात उसाची लागवड बघायला मिळते.

उसाचे क्षेत्र (Sugarcane Field) वाढत आहे यामुळे उत्पादनात वाढ होणे देखील साहजिक आहे मात्र ऊस उत्पादक शेतकरी बांधव खोडवा उसाचे उत्पादन घेत नसल्याने उत्पादनात घट होत असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार नमूद करत आहे.

ऊस उत्पादनात घट होण्याची कृषी तज्ञांनी अनेक कारणे सांगितली मात्र सर्वात मुख्य कारण खोडवा उसाचे उत्पादन न घेणे असे देखील त्यांनी नमूद केले.

कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांना खोडवा ऊस लागवडीतून कमी उत्पादन मिळण्याची आशंका असते यामुळे ते खोडवा उसाचे उत्पादन घेण्यास टाळाटाळ करतात.

मात्र जर खोडवा उसाचे योग्य व्यवस्थापन केले तर या पासून लागणीच्या उसापासून जेवढे उत्पादन मिळते तेवढे उत्पादन निश्‍चितच मिळू शकणार आहे.

सर्वप्रथम खोडवा ऊस उत्पादन घेण्याचे फायदे
»मित्रांनो जसे की आपणास ठाऊकचं आहे लागनीच्या उसासाठी योग्य तऱ्हेने पूर्वमशागत करावी लागते शिवाय ऊस लागन करावी लागते मात्र खोडवा उसासाठी पूर्वमशागत आणि लागवड करण्याची अजिबात आवश्यकता नसते. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा मोठा पैसा वाचतो.

»बेणे बीजप्रक्रिया आणि ऊस लागवडीसाठी आवश्यक मजुरी इत्यादींचा खर्च वाचतो.

»मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, खोडवा उसाचे उत्पादन घेतले तर याचे उत्पादन लावणीच्या उसापेक्षा एक ते दीड महिना अगोदर येऊन जाते. कारण की लावणीमध्ये बेणे जमिनीत लावल्यानंतर त्याला अंकुरण घेण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागूनच जातो.

»विशेष म्हणजे खोडवा पीक पाण्याचा खंड पडला तरीदेखील सहन करू शकते.