अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- दोन अविवाहित तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रवींद्र रामभाऊ ससाणे (वय ३२) तर श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर येथील कुणाल रवींद्र घोडके (वय २२) या दोन तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नानासाहेब जनार्धन ससाणे आणि विशाल रावसाहेब घोडके यांनी फिर्याद दिली आहे. या दोघांच्या फिर्यादी वरून श्रीगोंदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान एकाच दिवशी दोन तरूणांनी आत्महत्या केलेच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.