Tata Upcoming SUV : सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही दिसणार नवीन अवतारात, मोठ्या बदलांसह या दिवशी गाजवणार मार्केट, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Upcoming SUV : टाटाची सर्वात जास्त विक्री करणारी एसयूव्ही जुलैमध्ये नवीन अवतारात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नवीन बदलांसह कंपनी नवीन कार मार्केटमध्ये घेऊन येत आहे. परंतु जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tata Nexon या एसयूव्हीने लाँच झाल्यांनतर खूप धुमाकूळ घातला होता. आता ही कार एका वेगळ्याच रूपात तुम्हाला दिसेल. परंतु अजूनही या कारच्या किमतीबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. जाणून घेऊयात या कारचे फीचर्स.

माहितीनुसार, कंपनी नेक्सॉन फेसलिफ्ट जुलैमध्ये लॉन्च करणार आहे. या कारचे फर्स्ट-जेन मॉडेल त्याच्या संकल्पना स्वरूपात उत्कृष्ट होत असून त्याच्या पहिल्या फेसलिफ्टसह, कंपनीकडून समोरच्या टोकाला अतिशय मस्क्युलर दिसणाऱ्या फ्रंट एंडसह सुधारित करण्यात आले आहे. कंपनीच्या का कारला भारतीय बाजारपेठेतून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

मिळणार प्रोजेक्टर सेटअप

कंपनीच्या आगामी कारच्या बाह्यभागांना संपूर्ण फेसलिफ्ट देऊ शकते. हे कर्व्ह संकल्पनेपासून प्रेरित असल्याचे दिसत असून यात स्प्लिट हेडलॅम्प सेटअप असणार आहे. यात LED डे टाईम रनिंग लॅम्प्स वरच्या दिशेला पाहायला मिळणार आहे. तसेच यात हेडलॅम्प युनिट बंपर जवळ असू शकते. इतकेच नाही तर यात प्रोजेक्टर सेटअपही असणार आहे.

असे असणार डिझाइन

या कारच्या बोनेटमध्ये अजूनही सपाट डिझाइन देण्यात आले आहे. नवीन अलॉय व्हील डिझाइनसह बाजूंना फ्लेर्ड व्हील कमानी असणार आहेत. तसेच नवीन रीअरव्ह्यू मिरर त्याच्या बाहेरील भागात असून, जे टाटा सफारी आणि हॅरियरकडून घेतले आहे. कारच्या मागील टोकालाही फेसलिफ्ट दिले गेले आहे. याला LED टेल लॅम्पचा एक आकर्षक संच मिळत असून जो लाइटबारद्वारे जोडण्यात आला आहे. या कारचे टॉप व्हेरियंट डायनॅमिक टर्न इंडिकेटरसह येत आहेत.

कसे असणार इंटीरियर ?

या कारमध्ये नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असणार आहे, जे अलीकडे हॅरियर आणि सफारीवर सादर करण्यात आले होते. इतकेच नाही तर यात नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असणार आहे. हे डिजिटल युनिटसह येत असून, जे नवीन सफारी आणि हॅरियरवर दिसले होते.