file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील चितळी गावातील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका घरामध्ये आढळून आला होता.

मुलीच्या नातेवाईकांच्या मागणीनंतर तिच्या मृतदेहाचे नगर येथील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून त्यात तिचा मृत्यू गळफासाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी आकाश खरात व सागर पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करीत आहेत.