जे नको व्हायला तेच होतंय… म्युकरमायकोसिस च्या रुग्णांना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता सतावत असतानाच, आता मुंबईसह महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय. दिवसागणिक वाढणाऱ्या म्युकरमायकोसिसने नागरिकांच्या काळजीत आणखी भर घातली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आणि दररोज कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे, तर दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत सुद्धा वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

गेल्या दीड महिन्यात फक्त मुंबईत या आजाराचे २९८ रुग्ण आढळले आहेत. तर एकूण ७४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होतानाचे चित्र पाहयला मिळत आहे.

एकट्या मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ९१८ वर पोहोचली आहे. त्यातील १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५५१ रुग्ण बरे झाले असून १८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एप्रिल, मे महिन्यात नियंत्रणात असलेला आजार आता वेगाने पसरत असल्याचे दिसत असल्यामुळं चिंता वाढली आहे. मुंबईत १३ जुलैपर्यंत म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण ६२० तर १०४ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णांचा आकडा ८१८ वर पोहचला, तर १७८ रुग्णांचा मृत्यू झाला.

एकूण आकडेवारी पाहिली तर केवळ दीड महिन्यात २९८ रुग्णांची भर पडली तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दीड महिन्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण ३२ टक्के तर मृत्यूचा आकडा ४० टक्क्यांनी वाढला आहे. एकिकडे कोरोनाचे संकट असताना

दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या आजाराने डोके वर काढल्याने म्युकरमायकोसिसचे सुद्धा संकट आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यातील विविध भागात सुद्धा म्युकरमायकोसिसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. उपराजधानी नागपूर येथे म्युकरमायकोसिसचे सध्या १५३६ रुग्ण आहेत, तर पुणे येथे १३६८ एवढे म्युकरमायकोसिसचे रुग्ण आहेत, तर औरंगाबाद येथे १३३१ एवढे म्युकरमायकोसिसचे रुग्ण सध्या आहेत.