अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी थकीत देणी 25 कोटी 36 लाख घेण्यासाठी गेल्या नऊ दिवसा पासुन आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात सकारत्मक चर्चा होण्या ऐवजी जर तर मुद्दे पुढे करुन आंदोलकांशी तडजोड केली जात असल्याने आंदोलकांनी आलेले प्रस्ताव फेटाळले आहे.

आंदोलक आठव्या दिवशी व नवव्या दिवशी भर पावसात आंदोलन सुरुच ठेवले आहे.पगार मिळाले नाही तर खाण्या वाचुन मरणार आहेच तर आंदोलन करुन मेले तरी चालेल असे कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी सांगितले. कामगारांचे आंदोलन चिघळण्यास सुरवात झाली आहे.

कामगार सक्षम अधिकाऱ्यां मार्फत लेखी मागण्या मान्य केल्यास आंदोलन मागे घेण्यास तयारी दर्शविली होती.कारखान्याचे सर्वसर्वा यांनी आंदोलनस्थळी येवून कामगारांच्या मागण्या बाबत चर्चा केली.या चर्चेत जर तरची भाषा वापरण्यात येत असल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.

खा.विखे यांनी कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे व संचालक मंडळ यांनी लेखी प्रस्ताव सोमवारी सकाळी आंदोलकांच्या हातात दिला.लेखी प्रस्तावात जे कामगार आंदोलन करीत आहे.त्यांच्या नावे देण्या ऐवजी युनियनच्या नावे दिला आहे.

लेखी प्रस्तावात कारखाना चालू झाल्या नंतर कामगारांची प्रथम देणी देण्यास प्राधान्य देण्यात येईल परंतू हे सर्व कारखाना चालू झाला तर कारखान्यास मुदत वाढ मिळाली नाही तर कारखाना चालू करणे अशक्य आहे.असा जर तरचा प्रस्ताव स्वीकारुन कामगारांच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतल्या सारखे होईल.असे कामगार नेते पेरणे याःनी सांगितले.

सोमवारी राञभर पाऊस तर मंगळवारी दिवसभर पाऊस सुरु असुन या पाऊसातही आंदोलक आपल्या भुमिकेवर ठाम आहेत.भर पावसात बसुन आंदोलन सुरु ठेवले आहे.या आंदोलनातून माझ्यासह कामगारांचेबरे वाईट झाल्यास त्यास खा.विखेसह संचालक मंडळ जबाबदार राहणार आहे.

मुसळधार पाऊस आला तरी या आंदोलन स्थळावरुन आम्ही हलणार नाही.कामगार अर्धे पोटी उपाशी राहून मरणाच्या दारात आहेच.आंदोलन करुन मेले तर चांगलेच होईल आंदोलकांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत.शासकीय अधिकारी आंदोलन थांबविण्यासाठी विखेसह संचालक मंडळाशी संपर्क करीत आहे पण त्यांचे कोणीही ऐकत नाही.

आंदोलकांच्या मुळ मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.कामगारांचा भविष्य निर्वाह व ग्र्याजुटीची रक्कम भरली तरच सेवानिवृत्त कामगारांना सेवानिवृत्ती वेतन मिळणार आहे. कामगार आंदोलनवार ठाम आहेत. पाऊस, वादळ याची भिती मनात नाही मागण्या मान्य होई पर्यत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.

दरम्यान 31 आँगस्ट रोजी कारखान्याची संचालक मंडळाची मुदत संपली आहे. संचालक मंडळास मुदत वाढ न मिळाल्यास प्रशासकाची नेमणूक कारखान्यावर होईल प्रशासक कारखाना चालू करण्यास असमर्थता दाखवत असल्याने पुन्हा कारखाना तोट्यात जाणार आहे.

तालुक्यातील ऊस उत्पादकांना ऊसासाठी दुसऱ्या कारखान्याच्या दारात पळावे लागणार आहे. एकंदर कारखाना कामगारांसह ऊस उत्पादक अडचणीत सापडणार आहेत.