अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षापासून राहुरी तालुक्यामध्ये करोनाचे कारण पुढे करून कोणत्याही प्रकारचा आरटीओ कॅम्प घेतला गेला नसल्याने अनेक तरुणांना लायसन नसल्यामुळे संतापाला सामोरे जावे लागत आहे.

याबाबत श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाने तातडीने कारवाई करून राहुरी तालुक्यामध्ये कॅम्प घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी दिला आहे.

भनगडे यांनी सांगितले, शासनाने गेली काही दिवसांपासून ऑनलाईन वाहन चालविण्याचे लायसन्स मिळण्या संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू केली आहे. ही योजना चांगली असली तरी काहीजणांसाठी ती डोकेदुखी ठरली आहे.

ऑनलाईन लायसन्स मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यास आधार कार्डचा पुरावा ऑनलाईन द्यावा लागतो. मात्र, ज्यांचे आधार कार्ड अपडेट नाहीत आणि ज्यांच्या आधार कार्ड मध्ये चुका आहेत,

अशा वाहन चालविण्याचा परवाना मिळवू इच्छिणार्‍या अनेकांचे त्यामुळे हाल होत आहेत. श्रीरामपूर आरटीओने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बंगला येथे दर सोमवारी होणारे आरटीओचे कॅम्प सुरू करून वाहन परवाना पाहिजे असणार्‍या वाहनचालकांना कॅम्पमध्ये वाहन परवाना देणे संदर्भामध्ये विनंती केली.

मात्र, आजतागायत श्रीरामपूर आरटीओ ऑफिसने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. अनेक जणांनी अर्ज करून ऑनलाइन लायसन मिळत नसल्याने पेंडिंग अर्ज कॅम्पच्या माध्यमातून तातडीने निकाली काढावेत, अन्यथा आंदोलनाचापवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा भनगडे यांनी दिला आहे.