जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे झाले नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगावमध्ये 47 गावांत शेती आणि पिकांचे सुमारे साडे सात कोटींचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा प्रशसनाने राज्याचे कृषी आयुक्त यांना पाठविला आहे.

दरम्यान तालुक्यांत शेती, पिकांचे, पशु धनासोबतच घरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी आधीच 14 कोटींच्या मदतीची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात 1 ते 7 सप्टेंबरदरम्यान पाथर्डी तालुक्यातील 27 गावांत आणि शेवगाव तालुक्यातील 17 गावे अशा 47 गावांतील 14 हजार 921 शेतकर्‍यांना अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला आहे.

यात जिरायत पिकांचे 8 हजार 742 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 5 कोटी 94 लाखांची भरपाईची आवश्यकता आहे.

बागायत पिकांचे 935 हेक्टरवर नुकसान झाले असून भरपाई पोटी 1 कोटी 26 लाख, तर 70 हेक्टरवर फळबागांचे नुकसान झाले असून

भरपाईपोटी 12 लाख 78 हजारांची मदतीची आवश्यकता आहे. या दोन तालुक्यात 9 हजार 748 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापोटी 7 कोटी 33 लाखांच्या मदतीची गरज आहे.