अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- विहीरीत पडल्याने पाण्यात बडुन बिबटयाचा मृत्यु झाल्याची घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावातील देसाईवस्ती परिसरात घडली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिंपरी निर्मळ परीसरातील हनुमान वाडी, देसाई वस्ती परीसरात गेल्या अनेक दिवसापासुन बिबटयाची दहशत होती.

या बिबटयाने परीसरातील अनेक कुत्रे व शेळयांचा फडशा पाडला होता. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावात वन विभागाने या बिबटयाला पकडण्यासाठी पिंजराही लावला होता.

मात्र हा बिबटया पिजऱ्यांत सापडला नाही. आज अचानक देसाई वस्ती परीसरातील दुर्गम भागात असलेल्या कैलास घोरपड़े यांच्या मालकीच्या विहीरीत पडुन मृत्यु झालेल्या अवस्थेत हा बिबटया आढळला आहे. वनविभागाचे कर्मचारी इद्रंभान शेळके यांनी घटनास्थळी येवुन पाहणी केली असुन पचंनामा केला आहे.