लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- देशासह राज्यात कोरोनाच कहर सुरूच आहे. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी व व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

वर्षभरापासून आर्थिक व्यवहार बंद झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने व्यापार्‍यांना आर्थिक झळ बसली आहे.

मालही पडून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने विविध करांमध्ये, बँकेकडील कर्जाच्या व्याजात व वीज बिलात सवलत द्यावी,

या मागणीसाठी येथील व्यापारी तथा स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अमित मुथा यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे.

व्यापार्‍यांची परिस्थिती हलाखीची झाली असून काही व्यापार्‍यांनी आत्महत्यादेखील केली आहे. सरकारने कडक लॉकडाऊन केल्याने व्यापार्‍यांचे व्यापार बंद असून उत्पन्नाचे साधन बंद आहे.

त्यामुळे सरकारने वीज बील, बँक व्याज, पालिका विविध कर सवलती बाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मुथा यांनी यावेळी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|