अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  कुठलीही शहानिशा न करता कालपासून एका वृत्तपत्राची जुनी बातमी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक सुद्धा त्या बातमीचा आधार घेत आपल्या Whatsapp च्या माध्यमांतून पाठवीत आहेत.

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकार ला काही निर्देश दिले आहेत. मात्र लॉकडाऊनचे कोणतेही निर्देश सरकार कडून देण्यात आले नसून सदर बातमी हि जुनी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.समाज माध्यमांवर काल पासुन व्हायरल होत असलेली बातमी खोडसाळ आहे.

विशेष म्हणचे ते वृत्तपत्राचे कात्रण ऑगस्ट महिन्यापुर्वीचे आहे. राज्यशासनाने नविन कुठलाही आदेश जारी केला नाही आणि सप्टेंबर महिन्याच्या अनुषंगाने ही जिल्हा पातळीवर ३१ ऑगस्टला जिल्हाधिकारी बैठक घेवुन ‘जो काय निर्णय घेणार’ त्यानंतरच आदेश जारी होईल.

समाजमाघ्यमातील ‘ती’ बातमी निराधार असल्याने कोणीही विश्वास ठेवू नये.सध्य स्थितीत, सर्व व्यवसायीक प्रतिष्ठानाना दिलेला अवधि ‘जैसे थे’ आहे.

केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी महाराष्ट्रातील परिस्थिति पुर्णपणे नियंत्रणात आहे. कडक निर्बंध शिथिल करताना ३ ऑगस्ट रोजी ज्या ११ जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले होते.यापैकी पुणे व कोल्हापुर येथील निर्बंध ही शिथिल केले आहे.

मात्र केंद्र सरकारने आगामी का़ळात सण-उत्सवाने होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहे.या बाबत मुख्यंमत्री सर्व संबंधितांची बैठक घेवून नविन निर्देश देवू शकता पण तो पर्यंत कुठलाही बदल शक्य नाही.