बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून साडेसात लाखांचा दंड वसूल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. श्रीरामपूर पोलिसांनी बेशिस्त प्रवासी वाहनचालकांवर कारवाई करून ई-चलनाद्वारे ५४ दिवसांमध्ये साडेसात लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी १ जुलै ते २३ ऑगस्ट या दरम्यान हजारो वाहनांवर कारवाया केली आहे. वाहनांची कागदपत्रे न बाळगणे, परवाना नसणे, नंबर प्लेटवर नावे टाकणे,

सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये वाहने लावणे, मास्क न वापरणे आदी कारणांवरून हा दंड ठोठावण्यात आला आहे. वाहनांची नोंदणी करताना अनेक वाहनचालक वेगळा मोबाइल नंबर देतात. सध्या वापरात असलेला नंबर मात्र वेगळा असतो. अशावेळी त्यांना ई-चलन भेटतच नाही. त्यामुळे हा दंड साचत आहे.

ई-चालानमुळे काम झाले सोपे :- यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड भरण्यासाठी वाहनचालकाला न्यायालयात अथवा वाहतूक शाखेत जावे लागत होते. मात्र, वाहनधारकांचा वेळ वाचवण्यासाठीआता ई-चालान प्रणाली कार्यान्वयित झाली आहे.

ज्यामुळे वाहनचालकांकडून दंडाची रक्कम कॅश स्वरुपात तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून वसूल करण्यात येते. ही दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पोलिसांचे काम सोपे आणि पारदर्शक झाले आहे.