अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-   नगर मनमाड रोडवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी राहुरी येथील कृती समितीच्या वतीने मंगळवार 31 ऑगस्ट 2021 रोजी तहसीलदार एफ.आर. शेख व पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले.

कृती समितीच्या वतीने नगर- मनमाड रोडवरील खड्डे येत्या १० दिवसात डांबरीकरण करून व्यवस्थित न बुजविले गेल्यास ११ सप्टेंबर २०२! रोजी राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड रोडच्या कडेला कृती समितीचे सदस्य स्वतःला खड्ड्यात गाडून घेतील अशा स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी कृती समितीच्या वतीने देवेंद्र लांबे,

वसंत कदम,अमोल वाळुंज,प्रमोद विधाटे, नसीब पठाण,श्रीकांत शर्मा,सचिन तारडे,तुषार कदम,प्रसाद कदम,सचिन कदम,नितीन मोरे,विठू राऊत,दुर्वेश वाणी,अमोल कदम,सुहास भांड,बाबासाहेब खांदे,सतीश घुले,सुजय पुजारी,संतोष कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.