file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  भिंगार शहर परिसरात असलेल्या लष्करी हद्दीत न्यू एस. फोर्स आर्मड कोअर सेंटर स्कूल जवळ असलेल्या लष्करी अधिकार्‍याचा बंगला अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाखांचा माल लंपास केला आहे.

याबाबत लष्करातील पार्थ सरी (मूळ रा.जम्मू काश्मिर हल्ली रा.आर्मड कोअर सेंटर स्कुल, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चोरटयांनी लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात घुसून 2 लॅपटॉप, 1 हार्डडिस्क, काही रोख रक्कम तसेच बंगल्याच्या परिसरात असलेली

चंदनाची 5 झाडे असा 3 लाख 56 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.