Bank FD : गुंतवणुकीचा विचार करताय? “ही” बँक 200 दिवसांच्या FD देतयं चांगला परतावा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank FD : सातत्याने रेपो दरात वाढ होत असल्याने देशातील खाजगी आणि सरकारी बँका त्यांच्या मुदत ठेवींना आकर्षक बनवण्यासाठी व्याजदर वाढवत आहेत. बँका जास्तीत-जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन मुदत ठेव योजना देखील आणत आहेत. तर काही बँका जुन्या योजनांचे व्याजदर वाढवत आहेत. अशातच पंजाब अँड सिंध बँकही आपल्या व्याजदराने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. बँक आपल्या एफडीवर ८.८५ टक्के दराने व्याज देत आहे.

222 दिवसांच्या FD वर वरील व्याजदर

बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, PSB उत्कर्ष 222 दिवसांच्या FD वर, सुपर ज्येष्ठ नागरिकांना 8.85 टक्के दराने व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 8.5 टक्के व्याज मिळेल आणि सामान्य ग्राहकांना 222 दिवसांच्या एफडीवर 8 टक्के व्याज मिळेल.

300 दिवसांच्या FD वर व्याजदर

पंजाब अँड सिंध बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना ३०० दिवसांच्या एफडीवर ८.३५ टक्के दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के दराने व्याज मिळणार आहे. याशिवाय 300 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीवर सर्वसामान्यांना 7.5 टक्के दराने व्याज मिळेल.

६०१ दिवसांच्या एफडीवर व्याजदर

पंजाब अँड सिंध बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना ६०१ दिवसांच्या FD वर ७.८५ टक्के दराने व्याज देत आहे. या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के तर सर्वसामान्यांना ७ टक्के व्याज मिळेल.

1051 दिवसांसाठी FD वर व्याजदर

पंजाब अँड सिंध बँक SRSD-1051 दिवसांच्या मुदत ठेव योजनेअंतर्गत अति ज्येष्ठ नागरिकांना 7.85 टक्के दराने व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीतील एफडीवर ७.५ टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, इतर ग्राहकांना 7 टक्के दराने व्याज मिळेल.

ज्या व्यक्तींचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात. तर, सुपर ज्येष्ठ नागरिक हे असे लोक आहेत ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे.