Farmer Success Story : ‘या’ शेतकऱ्याने शून्यातून निर्माण केले विश्व; अफाट कष्टाने तयार केला निर्यातीतून केळीचा ब्रँड, वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story :- व्यक्तीमध्ये जर जिद्द, अफाट कष्ट करण्याची क्षमता आणि प्रयत्नांमधील सातत्य असेल तर व्यक्ती अगदी शून्यातून सुरुवात करून स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण करू शकतो.

हा मुद्दा प्रत्यक्ष प्रत्येक क्षेत्रासाठी लागू होतो व तसाच तो कृषी क्षेत्रासाठी देखील लागू होतो. आपण आजकाल कृषी क्षेत्रामध्ये देखील असे अनेक शेतकरी पाहतो की, दुसऱ्यांकडे मजुरी करता करता देखील प्रचंड कष्ट आणि सातत्य व जिद्दीच्या जोरावर त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये स्वतःचे एक वेगळेच विश्व निर्माण केल्याचे आपण पाहतो.

या गोष्टी एका रात्रीत नक्कीच घडत नाहीत, परंतु एक दिवस मात्र नक्कीच घडतात व हाच विश्वास ठेवून असे व्यक्ती काम करत असतात. याच मुद्याला धरून जर आपण जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या अंतुर्ली येथील लुकमान शेख यांची यशोगाथा बघितली तर ती काहीशी अशीच आहे.

जीवनामध्ये संघर्षाने सुरुवात केली व प्रचंड मेहनत घेऊन केळीची निर्यात व केळीचा व्यापार यामध्ये प्रचंड प्रमाणात यश त्यांनी मिळवले आहे.

लुकमान शेख यांचे सुरुवातीचे दिवस

लुकमान शेख यांचे वडील इस्माईल शेख यांचा लाकूड फोडण्याचा व्यवसाय होता. त्यांच्यासोबतच लुकमान आणि त्यांचे भाऊ हे पडेल ते काम करायचे व उदरनिर्वासाठी कुटुंबाला मदत करायचे.

यामध्ये शिक्षण घेणे गरजेचे असते त्या पंधराव्या वर्षाच्या वयापासून त्यांनी गवंडीच्या हाताखाली बांधकाम मजुर म्हणून काम करायला सुरुवात केली. पाच वर्षे हे काम केले परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले व कुटुंबातील अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काय करावे हा विचार त्यांच्यापुढे होता. त्यामुळे त्यांनी थोडेसे धाडस केले व बांधकाम व्यवसायामध्ये ठेकेदारीचा व्यवसाय सुरू करून दोन पैसे मिळवायला सुरुवात केली. परंतु नियतीच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी होते.

बांधकाम व्यवसाय मध्ये असताना त्यांच्या परिसरातील केळी बागा असलेले शेतकरी तसेच व्यापारी व बाजारपेठ यांची माहिती त्यांना हळूहळू होत गेली व त्या पद्धतीने ते प्रयत्न करत राहिले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून 2015 मध्ये मध्य प्रदेशात केळी पाठवण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.

जेव्हा त्यांनी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांचा खरेदीदार तसेच केळीची मागणी व पुरवठा या गोष्टींचा सखोलपणे अभ्यास होऊ लागला. या व्यवसायामध्ये त्यांना बऱ्याचदा तोटा झाला परंतु न डगमगता त्यांनी त्यांच्या गावाजवळ म्हणजेच अंतुर्ली जवळ एक केळी पिकवणी केंद्र उभे केले.

त्यांची परिसरातील शेतकऱ्यांशी चांगली ओळख असल्यामुळे त्यांना दर्जेदार केळी देखील उपलब्ध होत गेली. या पद्धतीने केळी व्यवसायामध्ये त्यांचे प्रगती व्हायला सुरुवात झाली.

या केळी पिकवण व्यवसायमध्ये ते केळीची थेटपणे शेतकऱ्यांकडून खरेदी करायचे व केंद्रात प्रक्रिया होऊन ती प्रक्रिया केलेली केळी भोपाल, खंडवा तसेच इंदोर, सारंगपूर तसेच उज्जैन इत्यादी ठिकाणी पाठवली जाते व त्या ठिकाणी त्यांनी मोठे व्यापारी व केळी खरेदीदारांचे जाळे तयार केले आहे.

यापुढे जात केळी निर्यातीचे केले धाडस

केळीची पाठवणुकीतुन उभा राहिलेल्या व्यवसायातून चांगले यश मिळाले व त्यांचा उत्साह वाढला. त्यामुळे आता व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले. याकरिता त्यांनी या क्षेत्रातील असलेले त्यांचे जवळचे मित्र व बाजारपेठेचा अभ्यास इत्यादी गोष्टी करून थेट केळी निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले व आखाती देशांमध्ये केळी निर्यात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या सगळ्या करिता प्री कुलिंग व कोल्ड स्टोरेजची आवश्यकता होती.

याकरिता त्यांनी तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करून 200 टन क्षमतेचे प्रक्रिया सुविधा केंद्र देखील उभारले व कृषी विभागाकडून त्याकरिता 33 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळवला. या प्रकारे त्यांनी केळी निर्यातीमध्ये स्वतःचा ब्रँड तयार केला असून सध्या लुकमान शेख 13 किलोच्या बॉक्समध्ये केळीची पॅकिंग करतात व मुंबईहून आखातात म्हणजेच इराण, दुबई तसेच इराक,

अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया या ठिकाणी केळीची निर्यात करतात व दर महिन्याला 50 कंटेनर पर्यंत त्यांची केळीची निर्यात पोहोचलेली आहे. या व्यवसायातून ते दर महिन्याला सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करतात. एवढेच नाही तर त्यांनी या व्यवसायामध्ये 500 मजुरांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे.

अशाप्रकारे लुकमान शेख यांच्या उदाहरणावरून दिसून येते की, व्यक्तीमध्ये जर काही नावीन्यपूर्ण करायची जिद्द असेल व त्याला कष्टाची जोड असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते व शून्यातून मोठे विश्व निर्माण करता येते.