file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते. 

कोविड लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार अर्थात एनटागीचे चेअरमन प्रो. नरेंद्र अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी लसीचे ३ ते ५ कोटी डोस मिळतील.

या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. त्यानुसार तयार केली जात आहे. अरोरा म्हणाले, पहिल्या टप्प्यात जर १ कोटी डोस आले तरी या टप्प्यात ३३ लाखाहून अधिक मुलांची नोंदणी केली जाऊ नये.

कारण, ज्यांना पहिला डोस दिला आहे त्यांना २८ दिवसांनंतर दुसरा आणि ५६ व्या दिवसानंतर तिसरा डोस द्यावा लागेल. त्या दृष्टीने स्टॉक पाहून नोंदणी व्हायला हवी.

देशात १२ ते १७ वयोगटातील मुलांची संख्या १३ कोटी असून यात १% म्हणजे सुमारे सव्वा कोटी मुले गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांनाच धोका अधिक आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना लस दिली जाईल.