Realme GT Neo 5 SE : 100W फास्ट चार्जिंग आणि 5500mAh बॅटरीसह येणार हा स्मार्टफोन, लॉन्चपूर्वी माहिती आली समोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme GT Neo 5 SE : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी रिलायमी या दिग्ग्ज टेक कंपनीनं आपला Realme GT Neo 5 हा स्मार्टफोन लाँच केला होता.

अशातच आता ही कंपनी आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी लवकरच Realme GT Neo 5 SE हा स्मार्टफोन लाँच करू शकते. 100W फास्ट चार्जिंग आणि 5500mAh बॅटरीसह हा स्मार्टफोन येणार आहे. परंतु, लॉन्चपूर्वी फोनचे डिटेल्स लीक झाले आहेत.

जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन

हे लक्षात ठेवा की अजूनपर्यंत कंपनीने आपल्या नवीन फोनबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, एका लीकमध्ये या फोनची माहिती समोर आली आहे. लीकनुसार, या फोनमध्ये 6.74-इंचाचा OLED डिस्प्ले असणार आहे जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1100 nits ब्राइटनेससह येईल. तसेच फोनच्या प्रोसेसिंगबद्दल बोलायचे झाले तर तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जनरल 1 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो.

या फोनमध्ये Realme GT Neo 5 प्रमाणे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. फोनमधील प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सलचा, दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि तिसरा सेन्सर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स असू शकतो. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येणार आहे.

या फोनच्या बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 5,500mAh बॅटरी पॅक केली जाऊ शकते, ज्यात 100W फास्ट चार्जिंग पाहिले जाऊ शकते. फोनमधील इतर कनेक्टिव्हिटीबद्दल झाल्यास या फोनमध्ये चार्जिंगसाठी यात 5G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्ट मिळत आहे.

फक्त 10 मिनिटांत होतो चार्ज

Realme ने नुकताच Realme GT Neo 5 हा फोन लॉन्च केला आहे. कंपनीचा हा फोन फ्लॅगशिप Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 240W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. त्याच्या चार्जिंगबद्दल, असा दावा करण्यात येत आहे की फोन 240W चार्जिंगसह 80 सेकंदात 0 ते 20 टक्के, 4 मिनिटांत 50 टक्के आणि 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 100 टक्के चार्ज होऊ शकतो.

फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट उपलब्ध आहे. Realme GT Neo 5 6.74-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर केला आहे, जो 1.5K, 10-बिट डिस्प्ले आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 39,000 रुपये इतकी आहे.