Mutual Fund : म्युच्युअल फंड योजना खूप चांगला परतावा देतात. म्हणून जास्तीत जास्त गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पण येथील गुंतवणूक जोखमीची गुंतवणूक मनाली जाते. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार आहेत, त्यांनीच येथे गुंतवणूक करावी.
ही जोखमीची गुंतवणूक असल्यामुळे येथे मिळणारे परतावे देखील बँक आणि पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त आहेत. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यांनी मागील काही दिवसांपासून चांगला परतावा दिला आहे.
या टॉप 10 म्युच्युअल फंड योजना गेल्या सलग 5 वर्षांपासून दरवर्षी चांगला परतावा देत आहेत. हा परतावा वर्षाला 20 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळेच या योजनांमधील गुंतवणूक वेगाने वाढली आहे. चला कोणत्या आहेत या टॉप 10 म्युच्युअल फंड जाणून घेऊया….
क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना मागील 5 वर्षांपासून दरवर्षी 26.10 टक्के परतावा देत आहे. येथे गेल्या 5 वर्षात गुंतवलेले 1 लाख रुपये वाढून 2.17 लाख झाले आहेत.
क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना मागील 5 वर्षांपासून दरवर्षी 22.83 टक्के परतावा देत आहे. गेल्या 5 वर्षांत 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.97 लाख रुपये मिळाले आहेत.
एक्सिस स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 21.72 टक्के परतावा देत आहे. गेल्या 5 वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 1.91 लाख झाली आहे.
क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 21.71 टक्के परतावा देत आहे. येथे केलेली 1 लाखांची गुंतवणू 5 वर्षात 1.90 लाख झाली आहे.
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 21.60 टक्के परतावा देत आहे. 5 वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1.90 लाख झाली आहे.
क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 21.26 टक्के परतावा देत आहे. येथील गुंतवणूक 5 वर्षात 1 लाख रुपयांवरून 1.88 लाख झाली आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना मागील 5 वर्षांपासून दरवर्षी 21.10 टक्के परतावा देत आहे. येथे 5 वर्षात 1 लाख रुपयांचे 1.88 लाख झाले आहेत.
एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 20.87 टक्के परतावा देत आहे. गेल्या 5 वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 1.86 लाख झाली आहे.
टाटा डिजिटल इंडिया म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 20.72 टक्के परतावा देत आहे. येथील गुंतवणूक 5 वर्षात 1 लाख रुपयांवरून 1.85 लाख झाली आहे.
क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही योजना गेल्या 5 वर्षांपासून दरवर्षी 20.18 टक्के परतावा देत आहे. गेल्या 5 वर्षात येथील 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 1.82 लाख झाली आहे.