Top 5 Cars : जबरदस्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत देशातील टॉप 5 कार, जाणून घ्या डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 5 Cars : देशात इंधनाच्या (Oil) किमती वाढल्या आहेत त्यामुळे कार (Car) खरेदी करत असताना जास्त मायलेज (Mileage) आणि कमी मेंटनेन्स असणाऱ्या कारला पहिली पसंती दिली जाते.

त्यामुळे सर्व कंपन्या या जास्तीत मायलेज देण्याचा प्रयत्न करत असतात. यापैकी काही कार्स अशा आहेत ज्या 1 लिटरमध्ये 25 KM पर्यंत रेंज देत आहेत.

जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज आणि उत्तम फीचर्स असलेली कार शोधत असाल तर तुम्ही मारुती सेलेरियोसाठी (Maruti Celerio) जाऊ शकता. Celerio च्या AMT वेरिएंट मॉडेलला 26.68 kmpl चा मायलेज मिळेल असा दावा केला जातो, तर मॅन्युअल मॉडेल 25.2 kmpl मायलेज देते.

होंडाची (Honda) सर्वात प्रसिद्ध कार होंडा सिटीचे (Honda City) नावही सर्वोत्कृष्ट मायलेज देणाऱ्या कारमध्ये समाविष्ट आहे. Honda City च्या e-HEV मॉडेलमध्ये तुम्हाला 26.5 kmpl चा मायलेज मिळते.

या कारचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हायब्रिड वैशिष्ट्य (Honda City Feature). म्हणजेच, ते इंधन आणि चार्जिंग मोडवर वापरले जाऊ शकते.

मारुती सुझुकी वॅगनआर ही निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वात लोकप्रिय कार आहे. WagonR चे AMT गिअरबॉक्स 1.0L मॉडेल 25.19 kmpl चे मायलेज देते. त्याचे मॅन्युअल मॉडेल 24.35 kmpl चा मायलेज देते.

एंट्री लेव्हल हॅचबॅक कारमध्ये टाटाची टियागो (Tiago) ही सर्वात सुरक्षित कार आहे. यासोबतच, टाटा टियागोचा AMT ट्रान्समिशन व्हेरिएंट 23.84 kmpl चा मायलेज देतो. टाटा टियागोची किंमत 5.22 लाख ते 7.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही कार 9 प्रकारात उपलब्ध आहे.

Renault कंपनीचा दावा आहे की Renault Kwid 22.3 kmpl चा मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत 4.49 लाख ते 5.83 लाख रुपये आहे. त्याच्या इंजिन पर्यायांमध्ये 0.8-लिटर आणि 1.0-लिटरचा समावेश आहे.