अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  राहाता तालुक्यातील रामपुरवाडी येथे घडली धक्कादायक घटना घडली असून १७ वर्षिय मुलाचा वीजेचा शाँक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राहारामपुरवाडी येथील प्रतिक बाळासाहेब भोरकडे (वय-१७) हा मुलाचा शेतात विजेच्या खांबावरील तारेचा शॉक बसला.

रामपूरवाडी येथील सरपंच संदिप सुराडकर व नागरिकांनी प्रतिक यास पुढील उपचारासाठी साखर कारखाना श्रीरामपुर येथे हलविले.

परंतु वैद्यकीय सूत्रांनी त्यास मृत म्हणून घोषीत केले. महाराष्ट्र विद्युत मंडळातील अधिका-यांनी सदर ठिकाणी येऊन पंचनामा केला आहे. प्रतिकच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.