file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-नेवासा तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचे एकाच आठवड्यात निधन झाले.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोनई येथील दरंदले गल्ली परिसरात वाघमारे कुटुंबीय वास्तव्यास आहे.

या कुटुंबातील सर्वात लहान भाऊ पोपट मुरलीधर वाघमारे( वय-६०) यांचे मंगळवार १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी त्यांचे बंधू बबन मुरलीधर वाघमारे ( वय-७२) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यानंतर दोन दिवसांनी मोठे बंधू वसंत मुरलीधर वाघमारे(वय-८५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. तीन सख्ख्या भावांचे एकाच निधन झाल्याने सोनई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाघमारे कुटुंबातील या दुःखद घटनेबद्दल ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री ना.शँकरराव गडाख, जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी शोक व्यक्त केला.