घरफोडीच्या तयारीतील दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-घरफोडीच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कर्जत पोलिसांनी अटक केली. हे दोन जण घरफोडीच्या तयारीत होते.

आरोपी हे कोठेतरी जबरी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने चेहऱ्यास मास्क लावून झाकून लोखंडी कटावणी, पक्कड, दोन धारदार चाकू हे कब्जात बाळगून सूर्यास्त सूर्योदय दरम्यान जात असल्याचे मिळून आले.या दोन जणांवर चोरी, घरफोडी, बेकायदा हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

अक्षय देविदास भोसले वय २५ वर्ष,रा.गांधीनगर झोपडपट्टी ता. कर्जत, मुक्या ऊर्फ मुकेश पितांबर रा. शिंदे वय २२ वर्षे, रा.नांदगाव ता.कर्जत मूळ रा. सातारा अशी अटक केलेल्या दोन सराईतांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे कि,२४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत होत असलेल्या घरफोडी चोरी करणारे आरोपी पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले, कोम्बिंग करता नेमलेले पथकातील अधिकारी कर्मचारी

यांना एम.एच.१६ सी.एल.१०६९ या मोटरसायकलवर दोन इसम संशयास्पद मिळून आले. ।कर्जत पोलिस स्टेशन च्या रेकॉर्डवरील सराईत घरफोडी चोरी करणारे आरोपी असल्याचे लक्षात आले.त्यांना विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

त्यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्यावर नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला चोरी घरफोडी जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.त्यावरून त्यांच्याविरुद्ध कर्जत स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ,त्यांनान्यायालयात समक्ष हजर केले असता

न्यायालयाने सहा दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस नाईक उद्धव दिंडे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा , अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,

उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस अंमलदार, अंकुश ढवळे पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, राणी व्यवहारे यांनी केली आहे.