ऐकावे ते नवलंच ! आता अंडरवेरपासून तयार होणार कंपोस्ट खत ; प्रदूषणाला बसणारा आळा

Viral News : जगात वेगवेगळे शोध वैज्ञानिक, संशोधक लावत असतात. या नवनवीन शोधाच्या माध्यमातून मानवी जीवनावर काही सकारात्मक तसेच काही नकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. आता अमेरिकेतील एका अंडरगारमेंट्स बनवणाऱ्या कंपनीने चक्क कंपोस्टेबल अंडरगारमेंट तयार केले आहेत. म्हणजेच या अंडरवेअरचे कंपोस्ट खत देखील बनणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

युज झाल्यानंतर हे अंडरवेअर कंपोस्ट खत बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते असा दावा केला जात आहे. खरं पाहता अंडरगारमेंट्स तयार करताना इलास्टेन नावाचं मटेरियल वापरलं जातं. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे मटेरियल प्लास्टिक सारखेच पर्यावरणाला घातक ठरते. याच विघटन होत नाही. विशेष म्हणजे या मटेरियलचा पुनर्वापर केला जाऊ शकत नाही.

साहजिकचं यामुळे पर्यावरणाची मोठी क्षती होते. आता प्लास्टिक मुळे पर्यावरणाला हानी पोहोचते म्हणून बहुतांशी राष्ट्रात प्लास्टिक वर बंदी आणण्यास सुरुवात झाली आहे. आपला भारत देश देखील यामध्ये मागे नाही, देशात प्लास्टिक बंदीसाठी धोरण आखले गेले आहे. पण अंडरगारमेंट्स मध्ये वापरण्यात येणाऱ्या या इलास्टेनमुळे प्लास्टिक सारखेच पर्यावरणाला नुकसान होते.

आता प्लास्टिक बंदीसारखी यावर तर बंदी घालता येणार नाही. पण अमेरिकेच्या एका कंपनीने यावर समाधान शोधल आहे. केंट ब्रँड, जो की एक अमेरिकन ब्रँड आहे आणि कॅनडियन उद्योजक स्टेसी ग्रेसी यांनी तयार केलेला ब्रॅण्ड आहे त्यांनी पिमा कॉटन नावाच्या अंडरगारमेंट तयार केल्या आहेत.

या अंडरगारमेंट्स मध्ये नायलॉन, पॉलिस्टर, स्पॅनडेक्स, इलास्टेन या मटेरियलचा वापर करण्याऐवजी पिमा कॉटन यां नैसर्गिक कापडाचा वापर झाला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे पिमा कॉटन कापडं पेरू देशात तयार होते. या कापडाचे अनेक फायदे आहेत. हे कापड तयार करताना मायक्रो प्लास्टिक आणि कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जात नाही.

अर्थातच हे कॉटन पर्यावरणासाठी पूरक आहे. कापडाचा वाढता कचरा पर्यावरणासाठी अतिशय घातक असल्याने लॉस एंजलिस मध्ये असलेल्या केंट या ब्रॅंडने पुरुषांसाठी आणि महिलांसाठी अंडरवेअर, टी-शर्ट आणि क्रॉप टॉप हे पिमा कॉटन पासून बनवले आहेत. हे कापडं पूर्णपणे रियूज करता येणार आहे.

याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कपडे जुने झाल्यानंतर जमिनीत विघटन होऊ शकतात आणि त्यापासून 90 दिवसात कंपोस्ट खत तयार होऊ शकते. साहजिकच अमेरिकेतील या ब्रँडने कापड उद्योगात एक मोठी क्रांती केली असून यामुळे पर्यावरण पूरक कापड निर्मितीची संकल्पना पुढे आली आहे. हा शोध कापड उद्योगासाठी मोठा उपयुक्त राहणार असून पर्यावरण वाचवण्यासाठी याचा फायदा होणार आहे.