ताज्या बातम्या

Vivo Vs Oneplus : दोन्हीपैकी कोणता फोन आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम? पहा फीचर्स आणि किंमत

Vivo Vs Oneplus : भारतीय टेक बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यामुळे अनेकांना कोणता फोन खरेदी करावा याबाबत गोंधळ उडत आहे. नुकताच Vivo आणि OnePlus या दोन कंपन्यांनी आपले दोन शक्तिशाली फोन लाँच केले आहेत.

Vivo T2 5G आणि OnePlus Nord CE Lite हे फोन नुकतेच बाजारात दाखल झाले आहेत. या दोन्ही फोनमध्ये कंपन्यांनी शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत. त्यामुळे ग्राहकांना या दोन्हीपैकी कोणता फोन करावा याबाबत प्रश्न पडला आहे. जाणून घेऊयात सविस्तरपणे..

कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट

जाणून घ्या वैशिष्ट्ये :

कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर या दोन्ही 5G फोनमध्ये, ब्लूटूथ आणि वाय-फाय समर्थित आहेत. विवोच्या Vivo T2 5G मध्ये 44 W फास्ट चार्जिंगसह 4500 mAh बॅटरी असून वनप्लसच्या Oneplus Nord CE Lite मध्ये सुपर VOOC फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कसा असेल कॅमेरा ?

OnePlus Nord CE Lite मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात सेल्फीसाठी प्राथमिक लेन्स 108 मेगापिक्सेल आणि 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा तर Vivo T2 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे, तर सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात येत आहे.

किती असणार किंमत?

किंमत: जर किमतीबद्दल विचार करायचा झाला तर Oneplus Nord CE Lite च्या 8GB RAM आणि 128 GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये इतकी आहे, तर त्याच्या 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी आहे.

तसेच Vivo T2 5G नुकतेच दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे, त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी आहे, तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये इतकी आहे.

कसा असेल डिस्प्ले आणि प्रोसेसर: वनप्लसच्या Oneplus Nord CE Lite मध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120 Hz आहे. तर डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास दिला आहे. तर या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे, इतकेच नाही तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित सिस्टम ऑक्सिजन ओएस 13 वर काम करत आहे.

दुसरीकडे विवोच्या Vivo T2 5G मध्ये 6.38-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1300 nits पीक ब्राइटनेससह प्रदान केला असून स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चा प्रोसेसर दिला आहे, तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित सिस्टम फन टच ओएसवर काम करत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts