file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- हवामान खात्याने जिल्ह्यात २ दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रवरा, मुळा व म्हाळुंगी नदीकाठच्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.

अतिवृष्टी झाल्यास नदी, ओढे-नाले वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. पूल-नाल्यावरुन पाणी वाहत असल्यास ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.

पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. धोकादायक इमारतींचा आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी.

आपत्कालीन प्रसंगी तहसील व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.