बाळ बोठे करणार होता आत्महत्या ? खिशात सापडली ‘ही’ सुसाईड नोट…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी हैदराबादेतून मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यास शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत बाळ बोठे बाबत अनेक खुलासे केले आहेत.

बाळ बोठे च्या खिशात सापडली सुसाईड नोट :- बाळ बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी हैदराबादेत 5 दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवलं.  हैदराबाद येथे त्याला अटक केल्यानंतर घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना सुसाईड नोट सापडली.

आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख  :- सुसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबियांना संपर्क करा असा उल्लेख या नोटमध्ये आहे.दरम्यान, बाळ बोठेच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली.त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख आहे.

मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा :- त्याच बरोबर माझा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर कुणाला संपर्क करावा, याची माहिती त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवण्यात आल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

२० मार्च पर्यंत पोलिस कोठडी :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर