कवडीमोल दर मिळाल्याने ‘टरबुज’ फेकले रस्त्यावर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सध्या प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून शेती व्यवसायास आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूजासह भाजीपाल्याची लागवड केली होती.

निसर्गानेही भरभरून दिल्याने पीकही चांगले आले. परंतु ऐन टरबूज काढणीला आले अन् माशी शिंकली, पुन्हा कोरोनाने थैमान घातले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे टरबूज उत्पादक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे.

परिणामी शेतकऱ्यांच्या टरबूजला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अक्षरक्ष: रस्त्याच्या कडेला टरबूज फेकून दिले.

आज प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतीमध्ये  देखील नवनवीन प्रयोग करत अनेक शेतकरी आपले नशीब अजमावून पाहत आहेत.

यात काहींना फायदा होतो तर काहींना तोटा होतो. परिणामी आपला शेतीमाल कमी भावात विक्री करावा लागतो. असंच काहीसा प्रकार टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी लॉकडाउनजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

याचा थेट परिणाम शेतीपिकांवर परिणामी शेतकऱ्यांवर होत आहे. नुकताच कांद्याने शेतकऱ्यांचा वांधा केला आहे.

कांद्यानंतर आता टरबुजाच्या बाजारभावाची लाली उतरल्याने उत्पादन खर्च तर दूरच, मात्र वाहतूक आणि मजुरीचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आनलेले टरबुज रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|