अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- थोर समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे नाव घेऊन जाणीवपुर्वक कोणी जर शिक्षकांची बदनामी करू पाहत असेल अशा विकृत प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसनार नाहीत.

आदरणीय अण्णासाहेब हजारे या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा आधार घेऊन राज्यातील समस्त प्राथमिक शिक्षकांची औरंगाबाद येथील एका स्थानिक वृत्तपत्राचा विकृत मनोवृत्तीचा संपादक सातत्याने बदनामी करत आहे.

भविष्यात या संपादकाकडून असा प्रकार घडला तर कायमचीच अद्दल घडवू असा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

औरंगाबाद येथील या मनोविकृत संपादक महाशयाने सातत्याने व्यक्तिद्वेशी मानसिकतेतून अण्णासाहेब हजारे यांच्याबद्दल आणि शिक्षकांबद्दल समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल अशा प्रकारच्या बातम्या वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहेत.

या महाशयाने देशाचे व राज्यातील जनतेचे दैवत पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचेकडून शिक्षकांबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नसताना या वर्तमानपत्राच्या संपादकाला कुठून साक्षात्कार झाला अनं शिक्षकांबाबत आण्णांच्या तोंडी चुकीचे वाक्य टाकून परत एकदा आपल्या विकृत स्वभावाचा प्रत्यय आणून दिला.

परंतु भविष्यात जर हा महोदय शिक्षकांच्या वाट्याला गेला तर त्याला कायमचाच धडा शिकवू, असा इशारा प्रवीण ठुबे, विकास डावखरे, आर पी राहाणे, मिनाक्षी तांबे-भालेराव, बाबा पवार, राम निकम, दत्ता गमे, मिलिंद तनपुरे, गणपत सहाणे, सुभाष गरूड,

तुषार तुपे, श्रीकृष्ण खेडकर, रविंद्र कांबळे, प्रल्हाद गजभिव, बाळासाहेब रोहोकले, सुनिल दुधाडे, दत्ता गायकवाड, दशरथ ढोले, संतोष खामकर, संतोष खंडागळे, बाबा तांबे, सुनिल पवळे, भाऊसाहेब हासे, सुजित बनकर, संजय दळवी, संतोष खोमणे, सोमनाथ घुले,

प्रमोद गाडे, राजेंद्र मोहळकर, रविंद्र अरगडे, संतोष निमसे, बाबा धरम, संतोष भोर, दिपक झावरे, दत्तात्रय गवळी, संदिप सुंबे, प्रताप खिलारी, हनुमंत निंबाळकर, ज्ञानेश्वर इंगळे, सुनिता कर्जुले, बाळासाहेब पाटोळे, सुदाम धिंदळे, विठ्ठल देशमुख, संदिप शिंदे यांनी दिला आहे.